0226118004 (माध्यमिक )

'पार्ले टिळक विद्यालय' मराठी माध्यम

स्थापना ९ जून १९२१ 

शाळेविषयी

 लोकमान्य टिळक यांच्या कर्तृत्वाने व राष्ट्रवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या काही ध्येयवादी पार्लेकरांनी लोकमान्यांचे एक सचेतन स्मारक पार्ल्यात उभारण्याचे ठरविले. दि. ९ जून १९२१ रोजी हे ध्येय “ पार्ले टिळक विद्यालय  ” या शाळेच्या स्थापनेने या ध्येयास मूर्त स्वरूप आले.  केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला.

चार विदयार्थ्यांसह ९८ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत.
‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. विद्यालयाच्या परंपरेचा वसा आताच्या मुख्याध्यापिका श्रीमती लतिका ठाकूर या चालवत आहेत. विद्यालयातील अनेक गुणवंत शिक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आधुनिक प्रसार माध्यमातूनही आमच्या विद्यालयातील शिक्षक विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक नामवंत माजी विदयार्थ्यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. विविध क्षेत्रांत या मान्यवरांनी विद्यालयाचेच नव्हे तर आपल्या देशाचेही नाव उज्ज्वल केले आहे.

Read More

कॅम्पस व्हिडीओ टूर

आगामी कार्यक्रम

पुरस्कार

गॅलरी

पायाभूत सुविधा

विविध उपक्रम