0226118004 (माध्यमिक )

प्रजासत्ताक दिन चिरायु होवो

प्रजासत्ताक दिन चिरायु होवो

शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या माध्यमिक व प्राथमिक विभागात संयुक्तपणे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न झाला. स्वतंत्र भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी दोन्ही विभागातील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सकाळी ७ वाजताच मैदानावर उपस्थित होते. देशभक्तीपर गीतांच्या ध्वनिमुद्रिकांनी छान वातावरण निर्मिती केली होती.सर्वप्रथम विद्यालयाची प्रार्थना घेण्यात आली. विद्यालयाच्या परंपरेनुसार प्रथम लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास व भारतमातेच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्या श्रीम. हर्षदा चव्हाण, मुख्याध्यापिका पार्ले टिळक विद्यालय, प्राथमिक विभाग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाची प्रतिज्ञा उदधृत केली.श्रीम. हर्षदा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताचे गायन झाले. त्यानंतर राज्य गीत म्हटले गेले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी प्रास्ताविक केले व प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली.तद्नंतर मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण बाई, श्रीमती मिठे बाई व प्राथमिक विभागाच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती केळुस्कर बाई यांच्या हस्ते प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखित मासिकांचे प्रकाशन करण्यात आले. प्राथमिकच्याच विद्यार्थ्यांनी गुच्छ कवायतीचे शानदार प्रदर्शन केले.समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या 4/3 या प्राथमिकच्याच वर्गाने छान समूहगीत सादर केले.यानंतर माध्यमिक विभागाचीही दोन समूहगीते सादर झाली.उपस्थिती व गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमानंतर माध्यमिक विभागाचा बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला.
आजच्या दिवसाचे औचित्य साधून दर्पण या संस्थेच्या मुखपत्राच्या वर्षपूर्तीनिमित्त यात शाळेतर्फे लेख तयार करून देणाऱ्या शिक्षिका श्रीमती लता सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच गेल्या वर्षभरातील सर्व अंक आणि त्यावरील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया शाळेच्या दर्शनी भागात मांडण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या समारोपात राष्ट्रीय गीताचे गायन होऊन विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली.

 
 
 
 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow