PTVM च्या NCC पथकाची गगनभरारी
पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागाची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनसीसी पथकाने आज आपल्या कारकिर्दीत आणखी एक मानाचे पान समाविष्ट केले आहे. भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संचलनात मुंबईचे पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांना मानवंदना देणाऱ्या सलामीवीरांमध्ये पाटिविमच्या एनसीसी पथकाचे 32 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यालयाचे NCC प्रमुख शिक्षक श्री.उमेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या एनसीसी संघाने अत्यंत चमकदार कामगिरी करत ही बहुमानाची संधी पटकावली.