0226118004 (माध्यमिक )

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशी

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागात अनंत चतुर्दशी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी संस्कृत शिक्षकांच्या मदतीने शास्त्रोक्तरीत्या गणरायाची पूजा केली. गणपती स्तोत्र व अथर्वशीर्ष यांनी पूजेची सांगता झाली. विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या वर्गांना हा मान देण्यात आला. यानंतर विद्यालय आरत्यांनी दणाणून गेले. आरत्या व गणपतीच्या नामघोषात शिक्षक व विद्यार्थी तल्लीन झाले. आरती नंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सादर झालेल्या ध्वनिक्षेपित कार्यक्रमात गणपती उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. फलकावरील सुंदर गणेशाचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.




Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow