पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला
भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. ध्वज प्रणाम करून विद्यार्थ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत अखंड प्रजासत्ताक दिनाची प्रतिज्ञा घेतली. सुरेल आवाजात राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीत सादर केले. विशेष आनंदाची बाब म्हणजे PTVA SchoolsNews Letter चे प्रकाशन संस्थेचे माननीय पदाधिकारी श्रीयुत पेठे सर (कार्यवाह) व श्री भाटवडेकर सर (सहकार्यवाह) यांच्या हस्ते झाले. सालाबाद प्रमाणे रंगतरंग, मुक्तांगण, स्वानंद या हस्तलिखित पुस्तिकांचे प्रकाशन झाले.’वंदे मातरम’ने कार्यक्रमाचा शेवट झाला.