पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाने उत्तम निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली
मार्च 2023 24 च्या शालांत परीक्षेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाने उत्तम निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली. शाळेचा एकूण निकाल 98.68% इतका लागला. कुमारी सावंत सस्मिता सुनील सुश्रुती ही विद्यार्थिनी 98.60% गुण मिळवून पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्यातिन्ही SSC माध्यमिक शाळांमधून पहिली आली. मराठी माध्यमाच्या शाळेसाठी ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. विद्यालयातून पाचवी आलेली विद्यार्थिनी कुमारी वाडकर पूर्वा हिने संस्कृत मध्ये शंभर पैकी 100 गुण मिळवण्याचा विक्रम केला. शाळेतून पहिल्या आलेल्या पाचही विद्यार्थिनींनी म्हणजेच आमच्या पंचकन्यांनी मुली कोणत्याही बाबतीत कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. ऑटिस्टिक किंवा विशेष गरजा असणारी मुले सुद्धा लेखनिक घेऊन या परीक्षेला बसली होती ..आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती सुद्धा उत्तम मार्कांनी पास झाली. या सर्वच मुलांच्या यशाचा शाळेला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे. खरोखरच मेहनतीने आणि जिद्दीने शाळेने हे यश खेचून आणले आहे. या यशामध्ये विद्यार्थी, पालक तसेच सर्व शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल गानू सर आणि संस्थेच्या मुख्य समन्वयक सौ जान्हवी खांडेकर यांनी पुष्पगुच्छ व मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयातील संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ दुर्वा कंटक यांचेही पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा अशीच अखंड राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.