पार्ले टिळक विद्यालय(मराठी माध्यम माध्यमिक विभाग )-विज्ञान दिन
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी 28 फेब्रुवारी 1922 रोजी आपला शोध निबंध प्रसिद्ध केला. त्या शोधाला पुढे रामण इफेक्ट्स म्हणून जगभर मान्यता मिळाली.या शोधासाठी डॉ. सी व्ही रामण यांना मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1988 पासून 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे,लोकजागृती,समाज प्रबोधन हा यामागील उद्देश आहे.
पार्ले टिळक विद्यालय (मराठी माध्यम), विद्यालयातील जिज्ञासा विज्ञान मंडळाने 28 फेब्रुवारी 2023 रोजी विज्ञान दिन साजरा केला.
ध्वनिक्षेपित कार्यक्रम, फलक लेखन तसेच सर सी व्ही रमण यांची माहिती व चित्रे प्रवेशद्वारापाशी लावण्यात आली होती.
प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून साठ्ये महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री.माधव राजवाडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचा परिचय व विज्ञान मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.
राजवाडे सर यांच्या व्याख्यानाचा विषय ‘कुतूहल’ हा होता. सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, शोध लावण्यासाठी प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जिज्ञासा असावी लागते तसेच या प्रश्नासंबंधीची पार्श्वभूमी,सध्याच्या परिस्थितीची माहिती असणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना त्यांनी काही प्रश्न विचारले, उदा.1. जर पृथ्वीची गती थांबली तर….2. भूपृष्ठावर एकाच वेळी जगभरातील सर्व लोकांनी उडी मारली तर काय होईल? खड्डा पडेल का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कसा विचार करावा यासंबंधीचे मार्गदर्शन उदाहरणासहीत केले.
सरांचे हे व्याख्यान विद्यार्थ्यांना उत्तेजन देणारे ठरले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.