मराठी माध्यम माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला
आज पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. माननीय मुख्याध्यापिका श्रीमती लतिका ठाकूर यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. त्याच बरोबर मराठी आणि हिंदी देशभक्तीपर समूह गीत गायन, NCC विद्यार्थ्यांचे आणि इयत्ता 9वी च्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट संचलन, कराटे आणि जिमनेस्टिक प्रात्यक्षिक झाले.
तसेच PTVA news letter च्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन संस्थेचे माननीय पदाधिकारी श्री. बन्सी धुरंधर यांच्या हस्ते झाले. या प्रकाशनासाठी ठाणे वैभव या वृत्तपत्राचे प्रमुख संपादक, गेली अनेक वर्षे पत्रकारितेत उत्तम कार्य करणारे व आमच्या या news letter चे डिझाईनिंग आणि प्रिंटिंग करणारे श्रीयुत मिलिंद बल्लाळ हे देखील आवर्जून उपस्थित होते.