0226118004 (माध्यमिक )

वार्षिकोत्सव

वार्षिकोत्सव

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळेच्या वार्षिकोत्सवानिमित्त शाळेच्या प्रवेशद्वारापाशी माजी विद्यार्थी साई दिलीप आजविलकर यांने टिळकांची अतिशय सुंदर रांगोळी काढली आहे. प्रथेप्रमाणे प्रमुख पाहुण्यांची माहिती शाळेच्या फलकावर लिहीली आहे. तब्बल दोन वर्षांनी शाळेचे पटांगण वार्षिकोत्सवानिमित्त दिमाखात सजले आहे. यावर्षी पहिल्यांदाच LED स्क्रीन चा वापर पार्श्वभूमीसाठी करण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे कलागुणदर्शनाचे सर्वच कार्यक्रम अतिशय देखण्यारूपात सादर झाले. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई, श्री. महेश महाजन हे उपस्थित होते. विशेष म्हणजे राज्य सरकारचे एकूण ८१ पुरस्कार प्राप्त महाजन हे शाळेचे १९९१ बॅचचे माजी विद्यार्थी आहेत.

 

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow