0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळकच्या माजी विद्यार्थ्यांनी दहावीतील मुलांना दिलेल्या करिअर गाइडन्स उपक्रम

पार्ले टिळकच्या माजी विद्यार्थ्यांनी दहावीतील मुलांना दिलेल्या करिअर गाइडन्स उपक्रम

पार्ले टिळकच्या माजी विद्यार्थ्यांनी दहावीतील मुलांना दिलेल्या करिअर गाइडन्स उपक्रमाचे दुसरे सत्र ११ फेब्रुवारी रोजी पार पडले. या सत्रामध्ये श्रीकांत सावंत, विश्वास तांबे, आदित्य बोरकर, हृषीकेश गोडबोले, रोहन आचरेकर, विरेंद्र ठाकूर, सचिन वागळे, गणेश देवरुखकर, विनोद टुकरूल, यशराज चवाथे, दिप्ती पेडणेकर आणि अनुजा चवाथे हे सहभागी झाले होते. या सत्रामध्ये उद्योजक म्हणून कारकीर्द घडवण्यापासून खेळाच्या क्षेत्रातील संधी, क्रिकेट स्कोअरर म्हणून संधी, अॅप डिझायनर, माध्यम क्षेत्रातील संधी, उभरत्या शहरांमध्ये इंजीनिअर म्हणून उपलब्ध होणाऱ्या संधी, इन्शुरन्स, बायोमेडिकल क्षेत्रातील संधी, एमबीए, जर्मन भाषेतील करिअर, शस्त्रास्त्रे निर्मिती, देखभाल अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या करिअर मार्गदर्शनाची नेमकी गरज काय, नोकरी किंवा करिअरची निवड कोणत्या निकषांवर करावी याबद्दलही उपस्थितांनी माहिती दिली. या मार्गदर्शनापलीकडेही विद्यार्थ्यांनी नृत्य क्षेत्रातील संधी, फॅशन डिझायनिंगमधील संधी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ म्हणून संधी याची विचारणा केली. या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न येत्या काळात करण्यात येणार आहे. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांनी आणखी कोणत्या क्षेत्रात मार्गदर्शन आवश्यक आहे त्याचीही विचारणा केली. या माध्यमातून येणाऱ्या काळात पुढील बॅचच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow