पार्ले टिळक विद्यालयात आज शिक्षण सप्ताहातील पहिला दिवस. शैक्षणिक साहित्य निर्मिती करून साजरा केला
*पार्ले टिळक विद्यालयात आज *23जुलै ते 28 जुलै *या शिक्षण सप्ताहातील पहिला दिवस *शैक्षणिक साहित्य निर्मिती* करून साजरा केला. विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सर्व भाषा आणि विज्ञान विषयातील शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली. मराठी , इंग्लिश, संस्कृत या विषयांची फळ्यावर वेगवेगळी कोडी, कार्डपेपरवरून शब्दांची ओळख, त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य म्हणून उपयोगी असणारे भाज्या, फळे, फुले यांची छान छान चित्रे शिक्षकांच्या साहाय्याने काढली गेली. काही विद्यार्थ्यांनी फलकावर स्वतः कोडी तयार करून ती आपल्याच वर्गातील मित्रांनां सोडविण्यास सांगून शिक्षकांची मदत घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला. तर काही वर्गात दिलेल्या मुद्द्यांवर कथा सांगण्याचा प्रयत्न केला किंवा ती कथा पूर्ण करण्याचा, इतर विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला गेला. काही वर्गांमध्ये शिक्षकांनी पाठातीलच मुद्दे देऊन विद्यार्थ्यांना कथा तयार करण्यास सांगून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला. याशिवाय काही वैज्ञानिक शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले. काही वैज्ञानिक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी जी छोटी छोटी पण त्याच्यातून आपल्याला बरेच काही आपल्या पुस्तकाच्या पाठ्यांशातील काही भाग सहज शिकणं सोपं आणि सुलभ होईल अशा प्रकारची शिक्षकांच्या सहाय्याने प्रात्यक्षिक वर्गात दाखविली. जी टिचिंग एड्स म्हणून आपल्याला वापरता येतात किंवा प्रात्यक्षिकासाठी निवड करता येते. याशिवाय काही विद्यार्थ्यांनी कार्ड पेपरपासून आपल्याला शिकवण्यासाठी चौकोनांचे प्रकार, त्रिकोनाचे प्रकार. यासारख्या अनेक वस्तू तयार केल्या की ज्याचा आपल्या शैक्षणिक साहित्यांमध्ये वापर करता येईल. अशा प्रकारे आज उत्साहात पार्ले – टिळक शाळेमध्ये *शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस जो *शैक्षणिक साहित्य निर्मिती* हा उद्देश यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतलेला दिसून आला.