शिक्षण सप्ताह – कौशल्य डिजिटल उपक्रम दिवस
शिक्षणाबद्दल जागृती व महत्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने *22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सप्ताह उपक्रमा अंतर्गत पाचवा दिवस (२६जुलै २०२४) *कौशल्य डिजिटल उपक्रम दिवस* पार्ले टिळक विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील कला, कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शिल्पकार श्री.प्रशांत सालप यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या. विद्यालयाच्या माजी शिक्षिका सौ. नवले बाई यांनी उत्स्फूर्तपणे आठवीच्या विद्यार्थ्यांना घरगुती कापडी पिशव्या शिवण्याचे मार्गदर्शन केले. मातीचे परीक्षण कसे करावे? यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘मुंबई ग्राहक संघातर्फे’ जागो ग्राहक जगो या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी, तो अधिक सजग बनावा यासाठी काही नाटुकली सादर करण्यात आली.ही नाटुकली आपल्या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने सादर केली.तसेच नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक प्रथमोपचाराची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली,त्यासाठी शिक्षकांनी काही प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखविली. अशा पद्धतीने आजचा चौथा दिवस माहितीपूर्ण,कला-कौशल्यांचा विकास करणारा आपल्या हक्कांची जाणीव करून देणारा व विद्यार्थ्यांना भविष्यात उत्तम नागरी बनवण्याच्यादृष्टीने प्रेरीत करणारा होता. या उपक्रमाद्वारे 21 व्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना आपण सक्षम करू शकतो. या उपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.