शिक्षण सप्ताह – दिवस चौथा सांस्कृतिक दिवस
आज दिनांक 25 जुलै, 2024 रोजी सांस्कृतिक दिवस साजरा केला गेला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांची वेशभूषा करून शेतकरी नृत्य सादर केले .त्या शेतकरी नृत्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या सुरेल आवाजात गाणे देखील म्हटले. शाळेतील इयत्ता सातवी मधील सार्थक शिगवण याने पक्षी आणि मुलगा यातील संवाद सादर करत एकपात्री अभिनय सादर केला. शिक्षिका श्वेता संखे बाई यांनी देखील एकपात्री अभिनय सादर केला.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी नाट्य प्रकारांची ओळख करून दिली व एक प्रायोगिक नाट्य प्रकार सादर देखील केला.
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी पौष्टिक खाद्यपदार्थ बनवणे या सदरात कडधान्य, मोड आलेले मूग, आणि मका यांची कोशिंबीर बनवण्याचा उपक्रम केला.
अशाप्रकारे सांस्कृतिक दिवस उत्साहात विद्यार्थी व शिक्षकांनी साजरा केला.



