होमी भाभा शैक्षणिक संस्थेतील निवृत्त वैज्ञानिक श्री. आनंद घैसास यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान -१ व चांद्रयान – २ या मोहिमांविषयी पॉवरपॉईंट प्रेझेंटेंशनसहित सविस्तर माहिती मनोरंजक पद्धतीने दिली.
विद्यालयाच्या निसर्ग मंडळाने शाळेच्या आवारात फुलझाडे, फळभाज्या, पालेभाज्या, धान्ये यांची लागवड करून परिसर हिरवाईने नटवला आहे. तसेच फुलपाखरांसाठी बाग तयार केली.