0226118004 (माध्यमिक )

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा  मुख्याध्यापिका – श्रीमती सुनीता मोहन धिवार 

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा  मुख्याध्यापिका – श्रीमती सुनीता मोहन धिवार 

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा 

मुख्याध्यापिका – श्रीमती सुनीता मोहन धिवार
पार्ले टिळक विद्यालय हि संस्था ९ जून १९२१ साली स्थापन झाली. आणि बी रुजून त्याला अंकुर फुटले. पुढे त्याची प्राथमिक शाळा एक फांदी तयार झाली. गेल्या ९७ वर्षात या रोपट्याचा महावृक्षाप्रमाणे विस्तार झाला. 
विद्यालयाच्या सुरुवातीपासून श्रीमती नाईक , श्रीमती भट , श्रीमती ताटके, श्रीमती रामा जोशी, श्रीमती गाडे अशा दिग्गज शिक्षकांनी मुख्याध्यापक पद  भूषवले आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाय तयार केला. 
शिक्षणाबरोबर कला , क्रीडा विविध अभ्यासपूरक उपक्रम याना प्राधान्य देऊन रोपट्याचा महावृक्ष तयार केला. बदलत्या धोरणानुसार प्राथमिक शाळेत विविध सुधारणात्मक बदल झाले आहेत. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, निरीक्षण क्षमता, स्नायूंचा विकास स्वावलंबन आत्मविश्वास, क्रियाशीलता वाढवण्यासाठी अनेक उपक्रमांनी शाळा समृद्ध होत आहे. 
प्राथमिक विद्यालयात काळाच्या गरजेनुसार इंग्रजी , संभाषण वर्ग , संगणक वर्ग, समुपदेशन व वाचनालय , कराटे, व्यायामशाळा , दृक्श्राव्य कक्ष, अधिक अध्यापन वर्ग , वैज्ञानिक खेळणी, सुट्टीतील शिबिरे , स्पर्धात्मक परीक्षा या गोष्टीचा अवलंब केलेला आहे. डिजिटल माध्यमांतून विविध प्रोजेक्ट्स तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करून प्रगतीपथावर पोहोचवण्याचे काम आमचे शिक्षक करत आहेत. 
शाळा म्हणजे संस्कार मंदिर होय. शिक्षणाचे अंतिम ध्येय आदर्श नागरिक घडवणे, माणुसकी जपणे, समाजात टिकून राहणे, समाजावर प्रेम करणे आणि समाजाला अमूल्य योगदान देणे या सर्व गुणांचे संवर्धन करणारी मुंबईतील नावाजलेली एकमेव शाळा म्हणजे ‘पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक शाळा’
शेवटी मराठीत नवप्रवेश घेणाऱ्या प्रत्येकाला सांगावेसे वाटते,
आकाशाकडे पाहताना आकाश होऊन पहावे लागते |
सर्वांगीण विकासकरिता पार्ले टिळक प्राथमिक शाळेत यावे लागते.|| 
                     

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow