पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहाने पारंपारिकरित्या साजरा
पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहाने पारंपारिकरित्या साजरा करण्यात आला. शाळेला आज साक्षात पंढरपूरचे रूप आले होते. विठू माऊली आणि रखुमाई ..निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई सह शाळेत अवतरले होते. शाळेतील प्रत्येक वर्गाला त्यांनी भेट दिली व विद्यार्थी भक्तांना भरभरून आशीर्वाद दिले. सजवलेली पालखी आणि दिंडीत नाचणारे पारंपारिक पोशाखातील विद्यार्थी विद्यार्थिनी सामाजिक भान विसरले नव्हते. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन दिला. कशाला जाऊ मी पंढरपुरी… शाळा हीच माझी पंढरी… हा अनुभव विद्यालयात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आज आला. शाळेत हा सोहळा चालू असताना पर्जन्य राजाने सुद्धा जोरदार हजेरी लावून जणू काही आशीर्वादाच्या धारा बरसवल्या.














