पार्ले टिळक विद्यालय आणि पा.टि.वि.अ.चे शतसंवत्सरी वर्षात पदार्पण…
९ जून २०२० रोजी आपली शाळा, पार्ले टिळक विद्यालय आणि त्याच बरोबर पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन (PTVA) ,ही आपली संस्था, शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे.
खरंतर हा सोहळा पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या लौकिकाला साजेल असा आखला होता व आपल्या उपस्थितीत या सोहळ्याला भव्य स्वरूप आले असते.
परंतु सद्यःस्थितीत कुठलाही समारंभ करून हा दिवस साजरा करण्याचा विचार देखील आपण कोणीही करणार नाही. त्यामुळे PTVA च्या व्यवस्थापक मंडळाने या वर्षी सध्याच्या अपवादात्मक परिस्थितीला साजेल अशाच पद्धतीनें आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत साधेपणानें या शतसंवत्सरी वर्षाला सुरुवात करायचे ठरवले आहे.
या दिवसाचे विशेष महत्व लक्षात घेता, ९ जूनच्या या छोटेखानी समारंभात सहभागी व्हायला आपल्याला नक्की आवडेल याची जाणीव असल्याने हा कार्यक्रम संस्थेच्या Facebook तसेच YouTube या चॅनेल्सवर दाखविण्याचे ठरले आहे.
कायाक्रमाची वेळ मंगळवार ९ जून २०२० सकाळी ९ वाजता (9th June 2020 at 9 AM).
संस्थेच्या You Tube तसेच Facebook वरील Live Channels ना subscribe करण्यासाठी खालील लिंक्सवर click करा :
https://www.youtube.com/channel/UCm84G7K_lQrLDJexiQt8QLQ
https://m.facebook.com/ParleTilakVidyalayaAssociation/?ref=bookmarks
Invitation






