पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माजी विद्यार्थ्यांनी केले मार्गदर्शन
शनिवारी २८ जानेवारी रोजी पार्ले टिळक विद्यालयाच्या मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांपैकी विविध क्षेत्रांत वेगळ्या वाटा चोखाळत स्थिरावलेल्या काही विद्यार्थ्यांनी सध्या पाटिवि मराठी शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी संगीत क्षेत्र, राजकारण, समाजकारण, अभिनय, व्हॉइसिंग, डबिंगचे क्षेत्र तसेच कायदे क्षेत्रातील कारकीर्दीची तोंडओळख विद्यार्थ्यांना करून दिली. यामध्ये निरंजन लेले, अजित जोशी, मधुरा वेलणकर, संदीप हस्तक आणि अॅड. अविनाश गोखले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. करिअर मार्गदर्शन सत्राचा हा पहिला भाग होता. पुढील भाग ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामध्येही काही वेगळ्या वाटांची ओळख करून देण्यात येईल.











