पाटिवि मधे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा झाला बालदिन!
मुंबई भेटीवर आलेले केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॅा. सुभाष सरकार यांनी बालदिनानिमित्त पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांशी अनेक विषयावर मनमोकळा संवाद साधला, मंत्री महोदयांनी यावेळी विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या हजरजवाबीपणाचे डॅा. सरकार यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी प्रकुलगुरू डॅा. अजय भामरे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू यांनी सन्मानचिन्ह देउन मंत्री महोदयांचा सत्कार केला. संस्थेचे सहकार्यवाह श्री. हेमंत भाटवडेकर यांनी संस्थेची स्मरणिका श्री. सरकार यांना दिली. संस्थेचे इतर पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.










