बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला!
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित के/पूर्व, के/पश्चिम, एच/पूर्व, एच/पश्चिम विभागातील आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला!
इयत्ता 3री, 4थीच्या विद्यार्थ्यांनी उत्तराखंडमधील ‘चपेली’ हे लोकनृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
शाळेला गौरवचिन्ह व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन!






