बालजत्रा
पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेने आज दिनांक 18 -2 -2025 रोजी बालजत्रा हा उपक्रम आयोजित केला.
बालजत्रेचे उद्घाटन पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष श्रीयुत गानू सर यांनी केले. समन्वयक श्रीमती खांडेकर मॅडम व गानू सरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन स्वतः खरेदी केली. मुलांचे गोड कौतुक केले व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
मुलांना बाजारहाट करता यावा खऱ्या चलनी नाणी ,नोटा यांचा वापर करून स्वतःहून आवडीच्या वस्तू, खाऊ खरेदी करता याव्यात यासाठीचा हा स्तुत्य असा उपक्रम म्हणजे बाल जत्रा.
या बालजत्रेत खेळणी, स्टेशनरी ज्वेलरी ,विविध खाद्यपदार्थ ठेवले होते .या उपक्रमात विद्यार्थी ,पालक, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या बालजत्रेत विविध खेळ खेळण्यासाठी विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले .फक्त एक रुपयात सायकल रायडींग यासाठी मुलांची झुंबड उडाली होती.












