पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेतील मुलांनी जल्लोषात गोकुळाष्टमी साजरी केली.
यादिवशी शालेय परिपाठातून श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कथा व लीलांची मनोरंजक माहिती देण्यात आली. मुलांनी श्रीकृष्णाच्या भक्तीगीतांचे गायन केले. इयत्ता 4 थी च्या गोप गोपिकांनी ठेका धरून नृत्य सादर केले. इयत्ता 4थी च्या गोविंदा पथकांनी थरावर थर रचत दहीहंडी फोडली आणि शेवटी दहीकाल्याच्या प्रसादाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.







