पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेत दिवाळी उत्सव
रामायण काळापासून सुरू झालेली दिवाळी साजरी करण्याची परंपरा आजही उत्साहात अनुभवायला मिळते. 

पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन हा प्रकाशाचा सण ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या उजेडात साजरा केला.
प्रत्येक दिवशीचे खास महत्त्व, फराळाची चव, दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि मातीचे किल्ले—या सगळ्यांनी वातावरण भारावून गेले. 
दिवाळीचा हा प्रकाश आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि प्रेरणेचा किरण ठरो! ![]()








