0226118004 (माध्यमिक )

चार दशकांची कृतार्थ वाटचाल

चार दशकांची कृतार्थ वाटचाल

२९ एप्रिल २०२३रोजी पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती लतिका नीलकंठ ठाकूर या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यावेळी विद्यालयाच्या एन. सी. सी. पथकाकडून बाईंना *गार्ड ऑफ ऑनर* देण्यात आले त्यानंतर शाळेत निकाल घेण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांशी ठाकूर बाईंनी ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने संवाद साधला. ठीक अकरा वाजता शाळेच्या भाषा दालनात निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला. यात मसूरकर बाई ,दळवी बाई, मिठे बाई यांनी ठाकूर बाईंचे गुणवर्णन करत अनेक आठवणीना उजाळा दिला. बाईंचे देखणे व्यक्तिमत्व, टापटीप राहणी, कवितांची आवड , शिस्तप्रिय तरीही प्रेमळ स्वभाव याविषयी सर्वच जण भावूक होवून भरभरून बोलले.याप्रसंगी बाईंचे वडील श्री नाईक आणि बाईंचे यजमान श्री. नीलकंठ ठाकूर , मुलगा निखील ठाकूर तसेच बाईंचे काका आणि शाळेचे माजी शिक्षक नाईक सर यानाही आमंत्रित केले होते..यावेळी आपल्या मिष्कील शैलीत श्रीयुत ठाकूर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाला रंगत आणली.. श्रीयुत विनय जोग सर, श्रीयुत भाटवडेकर सर आणि श्रीमती खांडेकर मॅडम हे संस्थेचे मान्यवर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. श्रीयुत भाटवडेकर सरांनी संचालक मंडळाच्या वतीने ठाकूर बाईचे कौतुक केले. माजी शिक्षकांच्या वतीने श्रीमती वेलणकर बाईंनी ठाकूर बाईंना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना ठाकूर बाईनी आपल्या आजवरच्या शाळेतील जवळपास ४० वर्षांच्या सेवेचा धावता आढावा घेतला. शाळेच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आखता आले दालनांच्या निर्मितीत सहभागी होता आले याविषयी समाधान व्यक्त केले. तसेच आजी आणि माजी विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून मिळत असलेले प्रेम आणि आदर या सर्वांविषयी स्वतःला भाग्यवान समजते असे नमूद केले. त्यानंतर शाळेतील विद्यमान शिक्षकांतर्फे एक सुरेल हिंदी गीत भेट म्हणून आपल्या मधुर आवाजात शाळेच्या संगीत शिक्षिका सौ.वंदना कुलकर्णी यांनी सादर केले व कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वांनी बाईना अनेक भेटी दिल्या . काही माजी विद्यार्थी आणि पालक बाईंना मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते.यावेळी ठाकूरबाईंनी आयोजित केलेल्या सहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला. पार्ले टिळक विद्यालय असोसिअशन संचालक मंडळानेही ३ मार्च रोजी मंडळाच्या बैठकीमध्ये ठाकूर बाईंना खास आमंत्रित केले होते. अध्यक्ष अनिल गानू यांनी पुष्पगुच्छ, चेक आणि मिठाई देवून बाईंचा सत्कार केला. सर्व संचालकांनी ठाकूर बाईंची कारकीर्द उत्तम राहिली आणि नेहमीच स्मरणात राहील अश्या शब्दात त्यांचे कौतुक करून त्यांना निरोप दिला.

 

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow