गणपती अथर्वशीर्ष पठण उपक्रम – पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळा प्राथमिक विभाग
पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळा (प्राथमिक विभाग) येथे वर्षभर चाविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीक नवीन आणि विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे – गणपती अथर्वशीर्ष पठण. 
या उपक्रमात इयत्ता १ली ते ४थीतील लहान मुले-मुली उत्साहाने आणि भक्तिभावाने सहभागी होतात. या वेळी प्रत्येक वर्गातील ५ नवीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना अथर्वशीर्ष पठणाची संधी दिली जाते.
गणक ऋषींनी रचलेले हे स्तोत्र एक उपनिषद आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. तर शीर्ष म्हणजे मस्तक. या स्तोत्राच्या पठणामुळे बुद्धी स्थिर होते, एकाग्रता वाढते आणि व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतो.
आपल्या जीवनात खरी गरज ही स्थिरबुद्धीची असल्याने गणपती अथर्वशीर्षाचे सातत्याने पठण केल्यास बुद्धिदाता गणपती प्रसन्न होऊन आपल्याला ज्ञान, स्थैर्य व सर्वांगीण प्रगती प्रदान करतो.






