कारगिल विजय दिन
शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेत भारतीय सैन्याचे 1999 सालच्या युद्धातील शौर्याचे प्रतीक म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून मोठ्या अभिमानाने उत्साहात साजरा केला.
शाळेचे माजी विद्यार्थी शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीर मातेला प्रमुख पाहुण्या म्हणून सविनय आमंत्रित केले.
याप्रसंगी बोलताना वीरमाता गोरे बाईंनी कणखर नेतृत्व, असामान्य धैर्य आणि रणांगणातील शौर्य कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमात सैनिकाचे आत्मवृत्त, कथा आणि वीर गीते इत्यादी सादर केले गेले.













