आंतरशालेय लंगडी स्पर्धा
शनिवार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमाच्या प्रांगणात आंतरशालेय लंगडी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
लंगडी स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विभाग निरीक्षिका श्रीमती भारती भवारी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन संस्थेच्या शैक्षणिक मुख्य आणि व्यवस्थापकीय अधिकारी माननीय खांडेकर मॅडम त्यांच्या उपस्थितीत असा देखणा समारंभ पार पडला. एकूण पंधरा शाळांनी सहभाग घेतला होता. पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचे व आपल्या संस्थेचे नाव उज्वल करण्यात यशस्वी झालेले आहेत .विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे खूप खूप कौतुक. शिकवणाऱ्या शिक्षकांचे खूप खूप कौतुक..
शाळेला प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल दोन ट्रॉफीज व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला









