उन्हाळी सुट्टी नंतरचा शाळेचा पहिला दिवस सर्वांसाठी नेहमीच विशेष महत्त्वाचा असतो. करोनाचे सावट नसते तर १५ जूनला पुन्हा शाळा भरली असती. आणि शताब्दी वर्षातला शाळेचा पहिला दिवस ठरला असतां . […]
९ जून २०२० रोजी आपली शाळा, पार्ले टिळक विद्यालय आणि त्याच बरोबर पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन (PTVA) ,ही आपली संस्था, शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. खरंतर हा सोहळा पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या लौकिकाला साजेल असा आखला होता व […]
के/पी ईस्ट वॉर्डचे विज्ञान प्रदर्शन दि. ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शैक्षणिक साधन स्पर्धेत विद्यालयातील शिक्षक श्री. अजय का. पाटील यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले व […]
समग्र शिक्षण अभियान समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत जागतिक समान संधी दिनानिमित्त दि. ३ ते ९ डिसेंबर २०१९ हा आठवडा विद्यालयात ‘समान संधी सप्ताह‘ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयात चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. दिव्यांग […]
सदर स्पर्धेत विदयालयाच्या विदयार्थ्यांनी ‘जोकर’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचे तृतीय पारितोषिक मिळाले. या एकांकिकेचे विशेष म्हणजे कोणत्याही पात्राला एकांकिकेची संहिता (स्क्रीप्ट) लिखित स्वरूपात दिली नव्हती. केवळ […]
होमी भाभा शैक्षणिक संस्थेतील निवृत्त वैज्ञानिक श्री. आनंद घैसास यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान -१ व चांद्रयान – २ या मोहिमांविषयी पॉवरपॉईंट प्रेझेंटेंशनसहित सविस्तर माहिती मनोरंजक पद्धतीने दिली.
विद्यालयाच्या परंपरेनुसार विद्यालयात गणेशोत्सव साजरा झाला. पर्यावरणाला हानिकारक अशा थर्माकोल, प्लास्टिक यांचा अजिबात वापर न करता पानाफुलांची सजावट करून श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी श्री अथर्वशीर्ष , […]