पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेत ‘सागर संपत्ती आणि नारळी पौर्णिमा’ या विषयावर एक अनोखे प्रदर्शन
सागर किनारा
– संपत्ती, संस्कृती आणि दळणवळण याविषयावर सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळा या विद्यालयात विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘सागर संपत्ती आणि नारळी पौर्णिमा’ या विषयावर एक अनोखे प्रदर्शन सादर केले. प्रदर्शनाचे उद्घाटन सन्माननीय श्रीमती जान्हवी खांडेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी समुद्रातील जीवसृष्टी, मासेमारीचे महत्त्व आणि नारळी पौर्णिमेचा सण कसा साजरा केला जातो, याबद्दल माहिती दिली.या प्रदर्शनातील मॉडेल मध्ये समुद्रातील विविध वनस्पती आणि मासे, तसेच मासेमारीसाठी वापरली जाणारी पारंपरिक साधने उदा.डोल,पेरा,पांग,होडी आणि बोटी तसेच आधुनिक युगातील सागरी सेतू , समुद्रातील अंतर्गत वाहतूक या मॉडेल च्या माध्यमातून सादर केले.विद्यार्थ्यांनी समुद्राचे पर्यावरण आणि त्याचे रक्षण करण्याच्या गरजे वर भर दिला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तरकरबाई यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेचे कौतुक केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या प्रदर्शनातून निसर्ग आणि मानवाचे अतूट नाते व पर्यावरणाचा समतोल कसा राखावा याचे सुंदर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.तसेच सागर संपत्तीचे आणि भारतीय सणांचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणा बद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली.













