१५ ऑगस्ट, ७९ वा स्वातंत्र्य दिन पार्ले टिळक विद्यालय (मराठी माध्यम) येथे अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १५ ऑगस्ट, ७९ वा स्वातंत्र्य दिन पार्ले टिळक विद्यालय (मराठी माध्यम) येथे अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.
प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी m कवायत, देशभक्तीपर परिपाठ, प्रभावी भाषणे, तसेच NCC विद्यार्थ्यांची रॅली अशा विविध उपक्रमांद्वारे आपली देशभक्ती व्यक्त केली.
संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी, गीते व देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेले होते. 









