गणेशोत्सव कार्यशाळा
महर्षी व्यासांनी रचलेला महाभारत हा ग्रंथ श्रीगणेशांनी सलग दहा दिवस बसून लिहिला. शरीराची उष्णता वाढू नये म्हणून त्यांना मातीचा लेप दिला आणि त्यातूनच पार्थिव गणेशमूर्ती स्थापनेची परंपरा सुरू झाली.
इ. १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत मनोभावे, संयमाने व एकाग्रतेने सुंदर गणेशमूर्ती व आरास तयार केली. 

विद्यार्थी आपल्या कार्यात एवढे रमले की जणू काही शाळेतच गणेशोत्सव साजरा होत आहे असे भासत होते. 

हा उपक्रम यशस्वी होऊन त्याचा मूळ हेतू पूर्णत्वास गेला आहे. 





