पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदात व उत्साहात साजरा केला गेला
पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागात आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदात व उत्साहात साजरा केला गेला. हरितक्रांतीपासून अण्वस्त्र प्रगतीपर्यंत भारताची यशोगाथा सांगणारे व भारत मातेला वंदन करणारे चित्र शाळेच्या फलकावर झळकत होते. दरवर्षीप्रमाणे एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली .समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या वर्गांनी सुश्राव्य समूहगीत सादर केले. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यालयातील शिक्षिका श्रीमती नवले व कचेरीतील कर्मचारी श्रीमती मेघना वाघ यांना ध्वजवंदनाचा मान देण्यात आला.. ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर गोळ्या देऊन विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले गेले व कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या देखण्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी यंदा प्रथमच एकत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्सव शाळेत साजरा केला.










