चांद्रयान ३ मोहिमेचे थेट प्रक्षेपण मराठी माध्यमाच्या शाळा, माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पाहिले
Chandrayaan 3 Mission: भारताची अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून (ISRO) एका महत्वपूर्ण मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. इस्रोसोबतच संपूर्ण भारताचं स्वप्न असलेलं चांद्रयान -3 लवकरच अंतराळात झेपावणार आहे. चांद्रयान -3 (Chandrayaan 3) हे श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन आज 14 जुलै रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी अवकाशाच्या दिशेने उड्डाण करणार आहे. यानिमित्ताने पाटिवि मराठी माध्यमिक शाळेतील हे फलक लेखन. रेखाटन- गोकुळ वाघ, चित्रकला शिक्षक
अवघा देश, अवघे जग रोखून धरील श्वास…..
चांद्रयान झेपावेल अंतराळात हा आहे विश्वास,
चांद्रयान 3 चे प्रक्षेपण व्हावे यशस्वी हीच इच्छा,
पार्ले टिळक विद्यालयाकडून याच मनःपूर्वक शुभेच्छा!!









