पार्ले टिळक विद्यालय मराठीमाध्यम माध्यमिक शाळा येथे असा साजरा झाला महाराष्ट्र दिन
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या पार्ले टिळक विद्यालय, मराठी माध्यम,माध्यमिक विभागात दिनांक *१ मे* *२०२३* रोजी मोठ्या उत्साहात *महाराष्ट्र दिन* साजरा झाला. विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीम. लतिका ठाकूर यांच्या हस्ते ध्वजावरोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या दैनंदिन प्रार्थनेने झाली.सर्व शिक्षक- शिक्षकेतर व उपस्थितांनी ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीताचे गायन केले. विद्यालयाचा मानबिंदू असलेल्या NCC पथकाने ध्वजाला मानवंदना दिली.
याप्रसंगी सर्व उपस्थितांनी राज्यगीताचे सामूहिकपणे गायन केले. राष्ट्रीय गीताचे गायन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.










