बाल जत्रेचा केला अट्टाहास, व्यवहारांची मुलांना लागली आस
सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळेत बालजत्रा भरली होती खासच. या बाल जत्रेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत गानू सर यांनी केले. तसेच संस्थेचे कार्यवाह श्रीयुत जोग सर संस्थेच्या समन्वयक श्रीमती खांडेकर मॅडम यांनी या बालजत्रेला भेट दिली. मुलांचा, पालकांचा उत्साह वाढवला. त्यांना प्रोत्साहन दिले. या बालगोपालांनी आपल्या पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू , गृहोपयोगी वस्तू आणि खाण्याचे विविध प्रकार विक्रीसाठी ठेवले होते. विद्यार्थ्यांना स्वतः खरेदी आणि विक्री करण्याचा अनुभव मिळावा, त्यातून त्यांना बाजार कसा चालतो हे समजावे, पैश्याचे महत्त्व समजावे या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. पालकांच्या उत्साही प्रतिसादामुळे आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षदा चव्हाण यांनी सांगितले.
या बालजत्रेची काही क्षणचित्रे.



















