कै. सुनील शेंडे यांना पाटिवि मराठी शाळा आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या संपूर्ण परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. (१९४७-२०२२)
हिंदी, मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टी गाजवलेले पार्लेकर श्री. सुनिल शेंडे यांचे दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले. कै.सुनील शेंडे हे पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम शाळेचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी १९६३ साली शालान्त ( तेव्हाची अकरावी ) परीक्षा उत्तीर्ण केली . शाळेचे नाव उज्ज्वल करणारे कै. सुनील शेंडे यांना पाटिवि मराठी शाळा आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या संपूर्ण परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.





