पार्ले टिळक विद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक !
पार्ले टिळक विद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक !
उत्कर्ष आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळेने “मैं ऐसा क्यूँ हूँ… “ एकांकिका सादर करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे बक्षिसे मिळाली आहेत.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (प्रथम) – सुमित तांबे
सर्वोत्कृष्ट संगीत (प्रथम) – निहार शेंबेकर
सर्वोत्कृष्ट नेपथ्य (द्वितीय) – सोहम वडये
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (तृतीय) – निर्मिती पवाळी
उल्लेखनीय अभिनय – ऋत्वा शेंबेकर
विशेष म्हणजे या यशामागे शाळेतील शिक्षकांबरोबर निहार शेंबेकर या इंग्रजी माध्यमाच्या माजी विध्यार्थ्याचा मोठा सहभाग आहे. पार्ले टिळक विद्यालयाच्या सर्व चमूचे हार्दिक अभिनंदन 






