‘फिट इंडिया मुव्हमेंट’
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दि. २९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ म्हणजेच स्वस्थ भारत चळवळीचा शुभारंभ केला. या चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी भारताच्या दिशेने वाटचाल करणार आहोत असे त्यांनी राष्ट्राला उदबोधून केलेल्या भाषणात सांगितले. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे भाषण व संपूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण विद्यालयात विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.







