मुख्याध्यापक
सौ. छाया चंद्रकांत गाडे
३७ वर्षे सेवा काल, मुलांच्या आनंददायी कृतियुक्त शिक्षणासाठी सदैव तत्पर. संवेदनशील , कवी मनाच्या व हळव्या वृत्तीच्या. मुलांचे प्रश्न त्यांच्या कुटुंबाशी निगडित असल्याने संवाद साधण्यात आघाडी. सहकार्याने समस्या सोडवताना टीमचा आनंद शोधणाऱ्या. अनेक शोधनिबंध सादर केले. यात शाळा व मुलांच्या विषयाला प्राधान्य. विविध पुरस्कारांनी सन्मानीत. शालेय मंत्रिमंडळ , पालक कार्यशाळा, पालकांसाठी वाचनालय , मधल्या सुट्टीतील वाचनालय, कुतूहल कोपरा , कौतुक फलक, वैज्ञानिक खेळणी, आनंदशाळा इत्यादी उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तनमनधन अर्पण करून त्यांच्या प्रगतीसाठी झटत असतात. ‘टीचर्स पेज’ मध्ये पाठाचा समावेश. पालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवले. मराठी शाळा टिकवणे व वाढवण्यासाठी विविध पातळ्यांवर सदैव कार्यरत. स्पर्धा परीक्षा व कल्पक उपक्रमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून झटत असतात. तंत्रज्ञान व ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा सतत अवलंब केल्याने पालक विद्यार्थी यांच्यात प्रिय. लेखन वाचनात मग्न !




