वाचन प्रेरणा दिन विद्यालयात साजरा..
माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांच्या वाढदिवस १५ ॲाक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त पार्ले टिळक मराठी माध्यमिक विभागात खूपच छान छान कार्यक्रम करण्यात आले. एपीजे अब्दुल कलाम यांचे सजीव दिसणारे चित्र शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आले होते. त्याखालीच येता जाता विद्यार्थ्यांना चाळता यावीत …पाहता यावीत… अशी पुस्तके ही मांडून ठेवली होती.जिन्यातील काचफलकात वाचनाविषयीची घोषवाक्ये देखील लावण्यात आली होती.ध्वनिक्षेपित कार्यक्रमाद्वारे वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी चे आपले मत देखील लिहायला सांगितले. वाचाल तर वाचाल हा महत्त्वाचा संदेश या दिवशी विद्यार्थ्यांना देण्यात आला.