अभिजात वाडमय मंडळाचे उद्घाटन….
अभिजात या मराठी वाड्मय मंडळाचे उद्घाटन विद्यालयातील मराठीच्या ज्येष्ठ शिक्षिका व उपमुख्याध्यापिका सौ माने बाई यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या घोषणा लक्ष वेधून घेत होत्या. विद्यालयातील संगीत शिक्षिका सौ कुलकर्णी बाई यांनी माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट.. ही कविता विविध रसांमध्ये आणि खूप सुंदर अशा चालीमध्ये विद्यार्थ्यांकडून गाण्याच्या स्वरूपात सादर केली.अभिजात वाड्मय मंडळाचे नावही अत्यंत आकर्षक पद्धतीने विद्यार्थ्यांनीच लिहिले होते. या मंडळाद्वारे भविष्यात मराठी भाषा संवर्धनासाठी अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत व योजना राबवल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व मराठी लेखनाला प्रोत्साहन मिळावे हाच या मंडळाचा हेतू आहे.